आरएसएस या संस्थेची अधिकृत नोंदणी नसल्यामुळे बेळगावात ९ ते ११ जुलै दरम्यान होणाऱ्या बैठकीला परवानगी देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद मुत्तण्णावर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.

गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी आरएसएस प्रमुखांकडे संस्थेच्या नोंदणीबाबत स्पष्टीकरण मागितले होते. सर्व संस्थांना नियम लागू असताना केवळ आरएसएसलाच सूट का, असा सवाल त्यांनी केला.

कार्यक्रमात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर जबाबदारी कोणाची, हे जाहीर झाले पाहिजे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे मिळेपर्यंत बैठकीला परवानगी देऊ नये, असे निवेदन मुत्तण्णावर यांनी दिले आहे.


Recent Comments