Uncategorized

‘त्या’ भगिनींना माजी आम. अनिल बेनके यांच्याकडून तातडीची मदत

Share

बेळगाव मधील कॅम्प भागातील महिला पोलिस ठाण्याजवळ दोन वृद्ध बहिणी अत्यंत धोकादायक शेडमध्ये राहत असून मुसळधार पावसामुळे सदर शेड धोकादायक परिस्थितीत असून या दोन्ही बहिणींच्या मदतीसाठी माजी आमदारांनी धाव घेतली आहे.


या वृद्ध महिलांच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. यापूर्वी त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेकडे लेखी विनंती करण्यात आली होती, मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

प्रशासनाच्या या उदासीनतेनंतर माजी आमदार अनिल बेनके आणि समाजसेवक संतोष दरेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पीडित वृद्ध महिलांच्या कुटुंबाशी सविस्तर चर्चा करून त्यांना धीर दिला. जिल्हा प्रशासन आणि छावणी मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या हतबल वृद्ध महिलांना लवकरात लवकर सुरक्षित शासकीय निवासस्थान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन माजी आमदार अनिल बेनके यांनी दिले.

Tags: