Uncategorized

रमेश जारकीहोळी यांचे ‘मौनं शरणं गच्छामि’! पुढील दोन महिने सरकारवर भाष्य नाही : रमेश जारकीहोळी

Share

राज्य काँग्रेस सरकारच्या कारभाराबाबत पुढील दोन महिने आपण मौन बाळगण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे.

म्हैसूर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना भाजप नेते रमेश जारकीहोळी यांनी सांगितले की, राज्य सरकारविरोधात किंवा सध्याच्या राजकीय घडामोडींवर मी पुढील दोन महिन्यांपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. दावणगेरे येथे आपण आधीच तीन महिन्यांचा वेळ देणार असल्याचे म्हटले होते, त्यापैकी एक महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे अजून दोन महिने वाट पाहून त्यानंतरच या विषयावर बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच वेळी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का, या प्रश्नावर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.

Tags: