बेळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आरटीओ कार्यालयाजवळील क्रांतीवीर संगोळी रायण्णा चौकात झाड अचानक ऑटो रिक्षावर कोसळले, मात्र सुदैवाने चालक या अपघातातून सुखरूप बचावला आहे.


मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे संगोळी रायण्णा चौकातील हे झाड रिक्षावर पडले. झाड पडल्यामुळे ऑटो रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कटर मशीनच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शहरात पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी जुन्या व जीर्ण झाडांच्या परिसरातून प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



Recent Comments