Uncategorized

राज्यभरात मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेला सुरुवात

Share

खानापूर तालुक्यात माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या कुटुंबीयांना निवडणूक नोंदणी अधिकारी बलराम चव्हाण यांनी फॉर्म सुपूर्द करून एसआयआर प्रक्रियेचा प्रारंभ केला.

खानापूर तालुक्यामध्ये आजपासून घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीचे पुनरीक्षण करण्याचे काम वेगाने सुरू झाले असून, अधिकाऱ्यांचे पथक तालुक्यातील नामांकित व्यक्तींच्या घरांना भेटी देत आहे. या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार तथा साहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी दुंडप्पा कोमार, सुनील देसाई, पत्रकार वासुदेव चौगुले यांच्यासह जांबोटी विभागाचे महसूल निरीक्षक, संबंधित बीएलओ आणि तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या कुटुंबाला फॉर्म दिल्यानंतर, याच मोहिमेचा पुढील भाग म्हणून दुसरे माजी आमदार अरविंद पाटील यांचीही प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना हे विशेष पुनरीक्षण फॉर्म दिले जातील आणि संपूर्ण तालुक्यात ही प्रक्रिया यशस्वीपणे राबवली जाईल, अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

Tags: