बेळगाव येथील आरपीडी कॉलेजमध्ये आयोजित भव्य समारंभात शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री डॉ. प्रभाकर बसवप्रभू कोरे यांचा साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीतर्फे सर्वोच्च सन्मान करण्यात आला.

बेळगाव येथील टिळकवाडीतील आरपीडी कॉलेजच्या आर. के. देसाई सभागृहात साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीतर्फे हा भव्य सत्कार सोहळा पार पडला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रभाकर कोरे यांनी शिक्षणात केवळ पारंपारिक वर्गातील अध्यापनावर अवलंबून न राहता संशोधन आणि कौशल्याभिमुख शिक्षणाला अधिक प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. यावेळी त्यांनी धर्मादाय संस्थांच्या नावाखाली होत असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी चिंता व्यक्त करत शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या शिक्षणाच्या व्यवसायावरही खंत व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर यांचे अध्यक्षीय भाषण पार पडले. कॉलेजचे प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर आनंद सराफ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. चारुशीला बाळिकाई यांनी मानपत्राचे वाचन केले. या वेळी डॉ. कोरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित दृकश्राव्य फित दाखवण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.


Recent Comments