Khanapur

“दारोळी येथील जेजेएम पाणी पुरवठा योजना २ वर्षापासुन कुचकामी ता.प.अधिकार्यानी चौकशी करावी.”

Share

दारोळी ( ता.खानापूर )गावात जेजेएम जल जीवन मिशन योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजनेच्या कामात बर्याच त्र्यूटी आणि निकृष्ट कामाचा दर्जा असल्याचा आरोप करत गेल्या दोन वर्षापासुन ही योजना कुच कामी ठरली आहे.असे मत माजी ग्राम पंचायत सदस्य यशवंत पाटील व गावकर्यानी तालुका पंचायत ईओ यानी चौकशी करावी. अशी मागणी केली आहे.

यावेळी दारोळी ग्राम पंचायत सदस्य यशवंत पाटील म्हणाले की कोट्यावधी रूपयाचा निधी खर्चून जे जे एम योजना राबविण्यात आली असली तरी या योजनेतील अनेक कामे अर्धवट असल्याचे म्हटले आहे. याशिवाय पाण्याच्या जलकुंभातून पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे ठ्याचे तीन तेरा झाले आहे .अशा परिस्थितीत कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.

याजबरोबर कामाचा दर्जा व तांत्रिक निकषाचे पालन झाले आहे का.?याची तपासणी करावी.दारोळी गाव हे निलावडे ग्राम पंचायतीत असुन तालुक्याच्या पश्चिम भागातील अति घनदाट जंगलातील व दुर्गम भागातील आहे.

दारोळी गावाला जे जे एम जल जीवन मिशन योजनेंतर्ग २ वर्षापूर्वी योजना राबविण्यात आली. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जल कुंभातुन पाण्याची गळती सुरू आहे.तेव्हा जलकुंभ केव्हा कोसळेल चाचा नेम नाही.गावात नळाव्दारे पाणी सोडले जाते मात्र नळाना चाव्या नाहीत. त्यामुळे पाणी वाया जाण्याची भिती आहे.संबधीत अधिकार्यानी जे जे एम योजनेच्या निकृष्ट कामाच्या दर्जाची पाहणी करावी.अली मागणी दारोळी माजी ग्राम पंचायत सदस्य यशवंत पाटील यानी केली आहे.

Tags: