Politics

“आरएसएसच्या वाटेला जाऊ नका”; प्रियांक खर्गेंना खासदार नारायणसा भांडगेंचा थेट इशारा!

Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नोटीस बजावणारे कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्यावर राज्यसभा खासदार नारायणसा भांडगे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “आरएसएसने सरकारकडून एक रुपयाचेही अनुदान घेतलेले नाही, त्यामुळे हिशोब मागण्याचा खर्गे यांना कोणताही अधिकार नाही,” असा संताप बांडगे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) नोटीस बजावल्याबद्दल राज्यसभा खासदार नारायणसा बांडगे यांनी कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. बांडगे म्हणाले की, आरएसएसने सरकारकडून कोणतेही अनुदान घेतलेले नाही, त्यामुळे हिशोब मागण्याचा खर्गेंना कोणताही अधिकार नाही. इतिहासात काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने विचारला नाही असा प्रश्न विचारून खर्गे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. “प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा आणि आरएसएसच्या वाटेला जाण्याचा मूर्खपणा करू नका, संघाशी लढण्याची ताकद जगातल्या कोणत्याही सरकारमध्ये नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

तसेच, खर्गेंनी आधी आपल्या चित्तापूर मतदारसंघातील ५० वर्षांचा उर्वरित आणि स्वतःच्या सरकारचा भ्रष्टाचार पहावा, अशी उपरोधिक टीकाही बांडगे यांनी केली.

Tags: