अपत्यहीन दांपत्यांसाठी दिलासादायक असणारे मोफत वंध्यत्व निवारण आणि मार्गदर्शन शिबिर मिरजमधील प्रसिद्ध सचिन हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात अनेक दांपत्य सहभागी होऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहेत.

संतानप्राप्तीच्या समस्येचा सामना करणाऱ्या अपत्यहीन दांपत्यांना नवी उमेद देण्यासाठी मिरजमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सचिन हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये येत्या २४ मे रोजी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिर होणार आहे.

सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर पार पडणार असून यात अनेक दांपत्य सहभागी होण्याची शक्यता आहे. या वेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित डॉक्टरांची टीम रुग्णांशी संवाद साधून योग्य ते उपाय सुचवणार आहे. प्रामुख्याने स्त्री वंध्यत्व, पुरुषांमधील शुक्राणूंची कमतरता, गर्भाशयातील गाठी, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असणे आणि वारंवार होणारा गर्भपात यांसारख्या गुंतागुंतीच्या समस्यांवर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने कशी मात करता येईल, याचे सविस्तर मार्गदर्शन तज्ज्ञांकडून केले जाईल.
या वेळी सचिन हॉस्पिटलमधील अत्याधुनिक टेस्ट ट्यूब बेबी प्रयोगशाळा (IVF), स्पर्म बँक आणि एग डोनेशन या सुविधांविषयी माहिती दिली जाणार आहे. याशिवाय गुप्तरोग आणि शारीरिक दुर्बलतेवरही येथे तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे प्रभावी उपचार केले जातील.
शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांची प्राथमिक तपासणी मोफत केली जाणार असून पुढील शस्त्रक्रिया आणि इतर उपचारांसाठी विशेष सवलत दिली जाणार आहे.
मिरजमधील छत्रपती शिवाजी रोडवरील हॉटेल प्रियदर्शिनीजवळ असणाऱ्या सचिन हॉस्पिटलमध्ये हे शिबिर संपन्न होईल. अधिक माहितीसाठी नागरिकांनी डॉ. सचिन किंवा डॉ. नेहा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments