बागलकोट येथे शिवजयंती मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ बेळगावात श्रीराम सेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. या घटनेतील दोषींवर गुंडा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना जिल्ह्यातून तडीपार करावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

बागलकोट येथे अत्यंत शांततेत सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीवर काही मुस्लिम समाजकंटकांनी दगडफेक केली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावात श्रीराम सेना संघटनेने रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. मिरवणुकीवर दगडफेक करणे हा केवळ अडथळा नसून साक्षात शिवरायांचा अपमान आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे श्रीराम सेनेचे नेते रवी कोकीतकर यांनी प्रशासनाला इशारा दिला की, या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली असली तरी, या कृत्यामागील मुख्य सूत्रधार आणि सर्व धर्मांधांना तातडीने जेरबंद करावे. राज्याची शांतता बिघडवणाऱ्या अशा शक्तींवर ‘गुंडा कायदा’ लावून त्यांना जिल्ह्यातून तडीपार करावे, असे रवी कोकीतकर यांनी म्हटले. यावेळी राजू कोकीतकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांनी घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली.
या प्रसंगी राजू कोकीतकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments