Bagalkot

बबलादी मठाची धक्कादायक भविष्यवाणी; राजकीय भूकंप आणि युद्धाचे संकेत

Share

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथील श्री गुरु चक्रवर्ती सदाशिव मुत्या यांच्या होस बबलादी मठाच्या यात्रोत्सवात आज २०२६ सालची काळज्ञान भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे. शिवरात्रीनिमित्त होणाऱ्या या यात्रेच्या शेवटच्या दिवशी चिक्कयप्पा यांनी वर्तवलेली ही भविष्यवाणी ऐकून भाविक थक्क झाले आहेत.

होस बबलादी मठाच्या परंपरेनुसार, शिवरात्रीच्या चौथ्या दिवशी यंदाचे महत्त्वपूर्ण काळज्ञान जाहीर करण्यात आले. २०२६ सालासाठी वर्तवण्यात आलेले हे भविष्य राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारे आहे. “राज्य सरकारमध्ये गोंधळ वाढणार असून, कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच सत्तेत मोठे फेरबदल होतील,” असे भाकीत करण्यात आले आहे. तसेच समाजात दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढणार असून जनतेने सावध राहावे, असा इशाराही देण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्ती आणि आंतरराष्ट्रीय संघर्षांबाबतही या भविष्यवाणीत सूचक उल्लेख आहेत. भीषण वादळामुळे वीजपुरवठा खंडित होऊन त्याचे रूपांतर आगीच्या मोठ्या दुर्घटनेत होईल, ज्यामुळे जीवितहानी संभवते, असे सांगण्यात आले आहे. आर्थिक क्षेत्रात सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार होऊन शेवटी घसरण होईल. विशेष म्हणजे, देशातील एका प्रभावशाली आणि चांगल्या व्यक्तीचा घातपाताने मृत्यू होण्याची शक्यता आणि दोन देशांमध्ये छुप्या युद्धाचे सावट निर्माण होईल, अशा शब्दांत या काळज्ञानातून भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Tags: