Bagalkot

अंबेडकरांच्या तत्त्वांनुसार समन्यायी समाज घडवणे हेच भाजपचे ध्येय : बी. वाय. विजयेंद्र

Share

भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बीळगी दौऱ्यात काँग्रेसच्या ‘व्होट बँक’ राजकारणावर कडाडून प्रहार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या भव्य रॅलीत सहभाग नोंदवत सामाजिक न्यायाचा संकल्प केला.

बागलकोट जिल्ह्यातील बीळगी शहरात आगमन झाल्यानंतर बी. वाय. विजयेंद्र यांनी डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आंबेडकर चौक ते भाजप कार्यालयापर्यंत आयोजित भव्य बाईक रॅलीत कार्यकर्त्यांनी भगवे ध्वज आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. काँग्रेस सरकार केवळ विशिष्ट वर्गाच्या लांगूलचालनात मग्न असून राज्यातील शेतकरी आणि तरुणांच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बी. वाय. विजयेंद्र यांनी केला.

भाजप कार्यालयात आयोजित ‘विबी जी राम जी’ जनजगृती कार्यक्रमात त्यांनी माजी मंत्री भैरती बसवराज यांच्या अटकेवर भाष्य केले. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर भाजपचे बारीक लक्ष असून, सूडबुद्धीने केलेल्या या कारवाईविरोधात न्यायालयात सक्षमपणे कायदेशीर लढा दिला जाईल, असे बी. वाय. विजयेंद्र यांनी स्पष्ट केले.

Tags: