goa

गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी डॉ. अंजली निंबाळकर मैदानात

Share

खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सध्या गोवा दौऱ्यावर असून, आगामी कोल्वा आणि बेनौलिम जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे.

काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. प्रचारादरम्यान बोलताना डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या की, कोल्वा आणि बेनौलिम या दोन्ही मतदारसंघांतील काँग्रेसचे उमेदवार हे सुशिक्षित, सक्रिय आणि जनतेची सेवा करण्याची जिद्द बाळगणारे तरुण चेहरे आहेत. विशेषतः महिला उमेदवारांच्या सक्षम नेतृत्वामुळे या भागाचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल. मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

या प्रचार दौऱ्यात डॉ. निंबाळकर यांच्यासोबत स्थानिक काँग्रेस नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गोव्यातील या निवडणुकीत डॉ. निंबाळकर यांच्या सक्रियतेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत आहे.

Tags: