एका १९ वर्षांच्या मुलीने एका २९ वर्षीय प्रियकरासोबत प्रेमसंबंधातून घरातून पळ काढल्याने, व्यथित झालेल्या वडिलांनी आपली मुलगी आपल्यासाठी मेली आहे, असे मानून तिचे श्राद्धकर्म केले आणि गावजेवण घातले. ही धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यामध्ये घडली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात नागरळ गावात सुश्मिता शिवगौडा पाटील नावाच्या मुलीने प्रियकरासोबत पळ काढला होता. यामुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्या जन्मलेल्या मुलीचे श्राद्ध घालून गावजेवण दिले आहे. सुश्मिता त्याच गावातील विठ्ठल बस्तवाडे नावाच्या तरुणासोबत पळून गेली आहे. विठ्ठल बस्तवाडे हा तहसीलदार कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत होता. सुश्मिता ही तिच्या वडिलांच्या चार मुलींपैकी सर्वात लहान होती.
कुटुंबाचे संस्कार मोडून मुलगी पळून गेल्याने शिवगौडा पाटील हे पूर्णपणे व्यथित झाले आहेत. त्यांनी सुरुवातीला रायबाग पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी सर्व बंधु-बांधव आणि नातेवाईकांना बोलावून मोठे भोजन आयोजित केले आणि मुलीचे श्राद्ध केले.


Recent Comments