ऊस उत्पादकांच्या आंदोलनादरम्यान शेतकरी नेते चून्नप्पा पुजारी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी बेळगावात वकिलांनी कामकाज बंद ठेवून आंदोलन केले.

शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे जमलेल्या वकिलांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईविरोधात घोषणाबाजी करत सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. शेतकरी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततेत आंदोलन करत असताना त्यांना बळजबरीने ताब्यात घेणे योग्य नसल्याची भूमिका आंदोलक वकिलांनी मांडली.

ऊस उत्पादक शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून उसाला योग्य दर मिळावा, अशी मागणी करत आहेत. त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल वकिलांनी नाराजी व्यक्त केली.
शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद देणे ही सरकारची जबाबदारी आहे. शेतकरी देशाचा कणा असून त्यांच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक आहे. ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांची तातडीने सुटका करावी आणि ऊस उत्पादकांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलक वकिलांनी केली.


Recent Comments