नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या 14 वर्षे वयोगटातील मुला/मुलींच्या राष्ट्रीय स्तरावरील ज्युडो स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करत,
– काकती सरकारी हायस्कूलची गायत्री बेळगावी – 32 KG गटात कांस्यपदक,
– व्ही.आर.के.सी. काकती शाळेचा साहिल नायक – 25 KG गटात रौप्य पदक,
– मुत्यानट्टी सरकारी शाळेची श्रेया बेळगावी – 27 KG गटात कांस्यपदक मिळवून बेळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.

या विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण विभाग बेळगावच्या उपसंचालक लीलावती हिरेमठ, बेळगाव शहर बी.ई.ओ. रवी भजंत्री, बेळगाव ग्रामीण बी.ई.ओ. पुंडलिक चौव्हाण, जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेदी पटेल, टी.पी.ई.ओ. साधना बद्री, प्रशिक्षण दिलेले आंतरराष्ट्रीय ज्युडो खेळाडू यल्लप्पा गोरव, विष्णू गोरव, शारीरिक शिक्षण शिक्षक महेश अक्की, मुख्याध्यापक अशोक खोत आणि शाळेचा कर्मचारी वर्ग, एस.डी.एम.सी. मंडळ, गावातील ज्येष्ठ नागरिकांनी अभिनंदन केले आहे.


Recent Comments