बागलकोट येथे भाजपमधील अंतर्गत घडामोडी आणि आमदार बसनागौडा पाटील यत्नाळ यांच्यावर काँग्रेस आमदार विजयानंद काशप्पनवर यांनी घणाघाती टीका केली.
पक्षातून हकालपट्टी केलेल्या नेत्यांनाच पुन्हा जवळ करण्याची वेळ भाजपवर आल्याचे सांगत त्यांनी बी. वाय. विजयेंद्र यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

बागलकोटमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना काशप्पनवर म्हणाले की, जेसीबी देण्याची भाषा करणारे आता कुठे गेले? त्यांनी असलेला जेसीबीसुद्धा साफ करून परत नेला आहे, अशा शब्दांत त्यांनी यत्नाळ यांना थेट टोला लगावला. याच वेळी बी. वाय. विजयेंद्र आणि यत्नाळ यांच्या भेटीचा संदर्भ देत त्यांनी भाजपच्या लाचारीवर बोट ठेवले. ज्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यांनाच पुन्हा मनवून पक्षात सामावून घेण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आहे. भाजप नेत्यांच्या अशा धरसोड वृत्तीमुळे पक्षाची उरलीसुरली पत आणि मर्यदाही धुळीस मिळाली आहे, अशी घणाघाती टीका करत त्यांनी भाजपच्या अंतर्गत संघर्षाची कडक शब्दांत उडवून लावली.


Recent Comments