बेळगाव येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत ‘युथ फॉर सेवा’ संस्थेच्या वतीने स्वयंसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या निवासी शिबिराचा रविवारी प्रारंभ झाला.

ध्येयगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या शिबिरात बेळगावातील विविध महाविद्यालयांचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. २००७ मध्ये स्थापन झालेली ‘युथ फॉर सेवा’ संस्था बेळगाव जिल्ह्यात गेली ९ वर्षे सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना समाजोपयोगी कामे आणि सामाजिक विकासाच्या उपक्रमांमध्ये अधिक सक्षमपणे सहभागी करून घेणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
या प्रसंगी आयसीएमआर बेळगावचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बन्नप्पा एस. उनगार, सुजाता दप्तरदार, युथ फॉर सेवा मार्गदर्शन समितीचे सदस्य प्रवीण प्याटी, डॉ. संगीता तोलगी, नीता गंगारड्डी, उत्तर प्रांत समन्वयक लक्ष्मण पूजारी, साधन व्यक्ती डॉ. चंद्रशेखर बी., डॉ. स्फूर्ती मास्तीहोळी आणि बेळगाव जिल्हा समन्वयक संतोष खोत यांच्यासह ६५ हून अधिक स्वयंसेवक उपस्थित होते.

चैत्रा आणि समृद्धी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


Recent Comments