Belagavi

सांबरा आणि उचगाव येथे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते दुर्गापूजा

Share

नवरात्रोत्सवानिमित्त बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सांबरा आणि उचगाव येथे आयोजित श्री दुर्गामाता पूजन कार्यक्रमात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.


सांबरा व उचगाव येथील पूजा कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी देवीची विशेष पूजा-अर्चा केली. या वेळी त्यांनी राज्यभरात सुख, शांती व समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना केली.


या प्रसंगी त्यांनी स्थानिक ग्रामस्थ व भाविकांशी संवाद साधत नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. अशा धार्मिक उत्सवांमुळे समाजात भक्तीभाव, प्रेम आणि सौहार्द वाढीस लागते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Tags: