नेपाळमधील काठमांडू येथे पार पडलेल्या जागतिक ज्युनियर पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावची गुणवान खेळाडू धनश्री बडसकर हिने सुवर्णपदक पटकावून देशाचा गौरव वाढवला आहे. ४८ किलो वजनी गटात एकूण २३५ किलो वजन उचलत तिने ही ऐतिहासिक कामगिरी केली.

काठमांडू येथे ९ आणि १० ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत धनश्रीने ज्युनियर महिलांच्या ४८ किलो वजनी गटात अव्वल स्थान पटकावले. तिने स्क्वॉटमध्ये ८० किलो, बेंच प्रेसमध्ये ४५ किलो आणि डेडलिफ्टमध्ये ११० किलो असे एकूण २३५ किलो वजन यशस्वीरीत्या उचलले.

धनश्रीच्या या दैदिप्यमान यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आणि बेळगावचा डंका वाजला असून सर्वस्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Belagavi
जागतिक ज्युनियर पॉवरलिफ्टिंग वर्ल्डकपमध्ये धनश्री बडसकरला सुवर्णपदक


Recent Comments