बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अभय पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन संरक्षण खात्याची जमीन हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.
बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी बेळगावमधील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संरक्षण खात्याची जमीन हस्तांतरित करून तेथे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि आयटी पार्क उभारण्याचे निवेदन दिले.

या जमिनीवर नवे उद्योग आणि कारखाने उभारण्यासाठी केंद्र सरकारने विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या काही महिन्यांत याचे सकारात्मक परिणाम बेळगावमध्ये दिसून येतील, असा विश्वास आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केला.


Recent Comments