Belagavi

बेळगाव ग्रामीणच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य: आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, धार्मिक आणि पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे मत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.

कुवेम्पूनगर येथील संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मतदारसंघातील ३६ मंदिरांच्या अंतिम हप्त्याचा निधी मंजूर झाल्याबद्दल मंदिर कमिटीच्या प्रतिनिधींना अभिनंदन पत्रे देण्यात आली.

गेल्या ७ वर्षांत मतदारसंघातील १५६ हून अधिक मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठी सुमारे १५० कोटींहून अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

शिक्षण क्षेत्रासाठी २५३ सरकारी शाळांच्या खोल्या आणि सिंचनासाठी १०० पेक्षा जास्त तलाव भरण्याच्या योजनेसाठी निधी आणल्याचे सांगत, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी आमदार हेब्बाळकर यांच्या विकासकामांचे कौतुक केले.

Tags: