State

स्वतः निवडलेल्या अधिकाऱ्यावरच मुख्यमंत्र्यांचा अविश्वास: बी. वाय. विजयेंद्र

Share

राज्य सरकारने स्वतः निवडलेले मुख्य निवडणूक अधिकारी अन्बुकुमार यांच्यावरच मुख्यमंत्री अविश्वास दाखवत असून, हे अत्यंत हास्यास्पद आहे, असा घणाघाती हल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी चढवला.

धारवाड येथे पश्चिम पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार एस. व्ही. संकनुर यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित रोडशोदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस सरकार ‘फॉर्म नंबर ७’ चा आधार घेऊन राज्यात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्याच नियंत्रणात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आरोप करणे चुकीचे आहे, असा टोला त्यांनी लगावला.

हमी योजनांसाठी निधी नसल्याने परिवहन संस्थांची ६ हजार कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अबकारी विभागावर दबाव आणून काँग्रेसने राज्याला मद्यपींचे राज्य बनवले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Tags: