बेळगाव ग्रामीण मतदारसंघ लवकरच स्वतंत्र तालुका म्हणून घोषित केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्ण होताच नवीन तालुक्याची अधिकृत घोषणा होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तहसीलदार कार्यालय आणि उपनिबंधक कार्यालयासह सर्व प्रशासकीय कार्यालये सुरू होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामीण भागात कचरा टाकणे योग्य नाही. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून कागती, बेळगुंदी आणि बसवण कुडची येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत.
ग्रामीण मतदारसंघात शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी २५० हून अधिक नवीन वर्ग खोल्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच मोरारजी देसाई निवासी शाळा, कामगारांच्या मुलांसाठी सीबीएसई निवासी शाळा आणि नवीन पदवी व नर्सिंग कॉलेज सुरू केली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.


Recent Comments