Belagavi

मंडोळीत मंदिर बांधकामाची लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून पाहणी

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मंडोळी गावात उभारण्यात येत असलेल्या श्री हनुमान, श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री कलमेश्वर मंदिरांच्या बांधकाम प्रगतीची काँग्रेस नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

गावातील प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक केंद्र असलेल्या या मंदिरांच्या कामाची माहिती त्यांनी स्थानिक नागरिक आणि संबंधितांकडून घेतली. मंदिर बांधकामात कोणत्याही प्रकारची दर्जाहीनता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी साहित्याचा दर्जा, भक्तांच्या सोयी-सुविधा आणि संरचनेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.

नियोजित वेळेत आणि वेगाने मंदिरांचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच, मंदिराच्या परिसराचा विकास, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि विजेची सोय याकडे विशेष लक्ष देण्यास त्यांनी सांगितले.

मंडोळीची धार्मिक परंपरा आणि नागरिकांच्या श्रद्धा लक्षात घेऊन भव्य व दर्जेदार मंदिरे उभारली जातील. भाविकांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जाईल, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.

या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते, मंदिर विकास समितीचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

Tags: