बेळगावातील कुमार गंधर्व रंगमंदिरात ४ ऑक्टोबर रोजी बसवादी शिवशरण हुगार मादय्या यांची जयंती आणि गुणवत्ता पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती बेळगाव जिल्हा हुगार, गुरव, जीर आणि पूजार समाज सेवा संघाचे अध्यक्ष शिवानंद हुगार यांनी दिली.
ते बुधवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मादय्या यांच्या जयंतीनिमित्त ४ ऑक्टोबर रोजी शहरातील चन्नम्मा सर्कलपासून मादय्या यांच्या प्रतिमेसह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक कुमार गंधर्व रंगमंदिरापर्यंत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मादय्या यांच्या जयंती सोहळ्यातच हुगार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सानिध्य श्री यतीश्वरानंद स्वामीजी लाभणार असून, उद्घाटन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते होणार आहे. तर सहकार मंत्री लक्ष्मण सवदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपला समाज संघटित झाला पाहिजे. गेल्या २०२४ मध्येही मादय्या यांची जयंती यशस्वीपणे साजरी केली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या जातील, असेही ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला शिवलिंगप्रभू हुगार, बी. एम. हुगार, महादेव हुगार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments