Belagavi

सुवर्णसौध गांधी पुतळा खर्चावरून उच्च न्यायालयात जाणार : भीमप्पा गडाद

Share

बेळगावच्या सुवर्णसौध आवारात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या खर्चाचा हिशोब देण्यात विविध विभाग टोलवाटोलवी करत आहेत. याविरोधात उत्तर कर्नाटक लढा समितीचे अध्यक्ष भीमप्पा गडाद यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर कर्नाटक लढा समितीचे अध्यक्ष भीमप्पा गडाद यांनी सांगितले की, म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेल्या पुतळ्याच्या निर्मिती आणि उद्घाटनाच्या खर्चाबाबत मार्च २०२५ पासून माहिती अधिकाराखाली अर्ज करण्यात आले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग, कन्नड आणि संस्कृती विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय कागदपत्रांची एकमेकांकडे टोलवाटोलवी करत आहेत.

सार्वजनिक कराचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही कोणताही विभाग जबाबदारी स्वीकारत नसल्याने या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गांधी जयंतीपूर्वी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून खर्चाचा सविस्तर तपशील जाहीर न केल्यास मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रांनुसार उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा भीमप्पा गडाद यांनी दिला आहे.

Tags: