Belagavi

क्रांती महिला मंडळातर्फे शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Share

क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या सुमन श्रीशैल कट्टी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, शिक्षणामुळे आयुष्यात मनोधैर्य प्राप्त होते आणि स्वावलंबनाने जगण्याचा मार्ग मिळतो, दोन्ही संस्थांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत या उपक्रमांमुळे इतरांनाही प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.

संगीतरत्न शंकर लक्ष्मण पाटील यांनी दैनंदिन जीवनात अध्यात्म आणि गुरूंचे महत्व विशद केले. तर समाजाभिमुख उपक्रमांना भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन गोमटेश विद्यापीठाचे अध्यक्ष वृषभ संजय पाटील यांनी दिले.

या प्रसंगी सुमन श्रीशैल कट्टी, संगीतरत्न शंकर लक्ष्मण पाटील आणि वृषभ संजय पाटील यांचा क्रांती महिला मंडळ व उमा संगीत प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आर्ष आश्रमातील मुली, डॉ. राजेंद्र मठद गुडगनट्टी यांच्यासह दोन्ही संस्थांचे सदस्य उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मंगला मठद होत्या. भारती रत्नपगोळ यांनी प्रास्ताविक केले, ममता अंटिन व अनिता जक्कण्णावर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, गीता एम्मी यांनी सूत्रसंचालन केले आणि मैना कुलकर्णी यांनी आभार मानले.

Tags: