२०१८ मधील मारहाण प्रकरणी सहकार मंत्री लक्ष्मण सवदी यांना अथाणी येथील चौथ्या जेएमएफसी न्यायालयाने समन्स बजावले असून ९ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

राजू जमखंडीकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे समन्स जारी केले आहे. तळवार समाजाला किती निधी दिला, असा प्रश्न विचारल्यामुळे लक्ष्मण सवदी यांच्या समर्थकांनी आपल्यावर मारहाण केल्याचा आरोप राजू जमखंडीकर यांनी केला होता.

लक्ष्मण सवदी यांच्या उपस्थितीतच ही घटना घडली असून त्यांच्या चिथावणीवरून हा प्रकार घडल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. याप्रकरणी अथाणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी पुढे चालू ठेवताना न्यायालयाने लक्ष्मण सवदी यांना ९ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.


Recent Comments