Belagavi

विजय मोरे यांच्या पुढाकारातून अज्ञात मृतदेहावर अंत्यसंस्कार

Share

बेळगाव येथील शवागारात दहा दिवसांपासून पडून असलेल्या एका अज्ञात मृतदेहावर माजी महापौर विजय मोरे आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आदरपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.

मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या या मृतदेहाच्या वारसांचा शोध घेण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर पोलीस अधिकारी राजश्री भोसले, डी. बी. पाटील, निषार समशर आणि शवागारातील दीपक यांनी माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली होती.

पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीला तत्काळ प्रतिसाद देत विजय मोरे यांनी पोलीस खात्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अंत्यसंस्काराची सर्व सोय उपलब्ध करून दिली.

कोणतेही नातेवाईक नसताना सदाशिव नगर स्मशानभूमीतील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत मृतदेहावर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या या सामाजिक भान आणि मानवी मूल्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Tags: