बेळगाव जिल्हा बाडी बिल्डर्स असोसिएशनतर्फे आयोजित २२ व्या ‘श्री गणेश २०२६’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत खेळाडूंनी आकर्षक शारीरिक सौष्ठव प्रदर्शन करत प्रेक्षकांची दाद मिळवली.

रामनाथ मंगल कार्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत ऋतिक लखे, श्रीहरी बेळगावकर, विकास शहापूरकर, सुनील भातकांडे, प्रवीण मजूकर आणि राहुल कुलाल यांनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला.

उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्रवीण मजूकर याने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’चा किताब पटकावला.
तर प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर ओमकार पाटील याने ‘बेस्ट पोझर’चा बहुमान मिळवला.
स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके आणि पदके देऊन सन्मानित करण्यात आले.


Recent Comments