खानापूर तालक्याच्या पश्चिम भागातील निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील कबनाळी गावच्या शिवारात हत्तीना भात पिकांचे नुकसान केले आहे.त्यामुळे शेतकर्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.


# एकीकडे पावसाचा पत्ता नाही, दुसरी
कडे हत्तीनी भातपिकांचे नुकसान केले!

खानापूर तालुका हा अतिजंगलाने व्यापलेला तालुका आहे.त्यामुळे जंगली प्राण्याकडुन नेहमीच शेतपिकाचे नुकसान
होत असते.गुरूवारी कबनाळी गावच्या बेटगेरी शिवारात तसेच भोई शिवारात शेतकरी लक्ष्मण राने, प्रकाश राने,
चाळोबा हुळणकर,उमाजी गावडे आदी शेतकर्याच्या शिवारात घुसून हत्तीनी भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच निलावडे ग्राम पंचायतीचे मा जी उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यानी कबनाळी शेतकर्यासह शेतात जा ऊन पाहणी केली.
हत्तीनी हातातोंडाशी आलेल्या भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले पाहुन शेतकर्याच्यावर उपासमारीची पाळी आल्याचे दिसुन आले.
एकीकडे पावासाने दडी मारल्याने शेतकरी चिंत्तेत सापडलेले आहे.तर दुसरी कडे पाणतळ जमिनित आलेले भात पिक हत्तीनी खाऊन फस्त केले.
त्यामुळे कबनाळी भागातील शेतकर्यावर उपास मारीची पाळी आली आहे.
तेव्हा आमदारानी व वनखात्याच्या अधिकार्यानी हत्तीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार दरबारी उपाय योजना मंजुर करून शेतकर्याना दिलासा द्यावा.अशी मागणी शेतकर्यातुन होत आहे.


Recent Comments