पूर्वी शहापुरात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरे यांनी गणेशोत्सवानिमित्त शहापूरला भेट देऊन महाआरतीत भाग घेतला व शहापूर हे माझ्या माहेरासारखे असल्याचे सांगत सौहार्दाचा संदेश दिला.


सुमारे दहा वर्षांपूर्वी शहापुरात सेवा बजावलेले पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरे यांनी काकेरू चौक, नवी गल्ली आणि खासबाग व्यापारी मंडळाच्या गणेशोत्सवात भेट देऊन आरती केली. या वेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव, विद्यमान नगरसेवक रवी साळुंके आणि पत्रकार प्रकाश बिळगोजी उपस्थित होते.


मुलीसारखा मी सणाला माहेरी आलो आहे असे सांगत सर्व समाजाने एकत्र येऊन सण साजरे करावेत, असा संदेश मुशापुरे यांनी दिला.

नेताजी जाधव यांनी मुशापुरे यांच्या कामाचे कौतुक केले. उपस्थितांनी आरती व प्रार्थनेत भाग घेत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.



Recent Comments