Khanapur

नंदगड पोलिसांची कारवाई, घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक

Share

नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईत २९ ग्रॅम सोने, २२० ग्रॅम चांदीचे दागिने आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

नंदगड आणि कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणांचा तपास करत पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी बीडी गावाजवळ चार आंतरजिल्हा चोरट्यांना ताब्यात घेतले. अटकेतील संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नंदगडचे पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी आणि सहकाऱ्यांच्या कामगिरीचे बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी कौतुक केले आहे.

Tags: