खानापूर तालुक्यातील खैरवाड येथे श्री गणेश मंडळाच्या वतीने नवीन मंदिराच्या स्लॅब भरणीचे काम सुरू करण्यात आले आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ करण्यात आला.

खानापूर तालुक्यातील खैरवाड (दुर्गा नगर) येथील श्री गणेश मंडळाच्या वतीने आयोजित नवीन श्री गणेश मंदिराच्या स्लॅब भरणीच्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार विठ्ठल हलगेकर यांनी हजेरी लावली. त्यांच्या हस्ते या धार्मिक विधीचा प्रारंभ झाला. यावेळी मंदिराच्या कामाची पाहणी करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. अशा धार्मिक व सामाजिक कार्यांमुळे गावात सलोखा दृढ होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.

मंदिराच्या आगामी सर्व विकासकामांसाठी आपले पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिले.



Recent Comments