Belagavi

विनाकारण निर्बंध लादले जाणार नाहीत, पण विसर्जन वेळेत करा ; आयुक्त प्रकाश निकम

Share

ऐतिहासिक बेळगाव गणेशोत्सवाच्या शेवटच्या चार दिवसांची मिरवणूक व विसर्जन महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी केली असून, मंडाळांच्या सहकार्याने हा सण शांततेत पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

बेळगाव गणेशोत्सवाच्या अखेरच्या चार दिवसांतील गर्दीचे व्यवस्थापन व विसर्जनासंदर्भात शहर पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या उत्सवाचे शेवटचे दिवस महत्त्वाचे असल्याने, गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डीसीपी नारायण बरमनि यांनी केले.

विसर्जन मार्गावरील लटकणाऱ्या तारा वर करणे, खड्डे बुजवणे आणि विसर्जन तलावांची स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांविषयी महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या.

बैठकीत बोलताना शहर पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी, नागरिकांना कोणतीही अनावश्यक अडचण किंवा विनाकारण निर्बंध लादले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले. तसेच मिरवणुका निविष्‍ट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देऊन, सुरक्षेसाठी पोलीस दल २४ तास उपलब्ध राहील, असे सांगितले. मंडळांनी कोणत्याही अनुचित प्रकारास थारा न देता उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, डीसीपी निरंजन राजें अर्स यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags: