बेळगाव : हिंडलगा येथील सेंट पीटर्स इंग्लिश मीडियम हायस्कूलचा इयत्ता ८ वीचा विद्यार्थी तनिष्क सतीश इंगळे याने १८ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
तनिष्कने अंडर-६८ किलो वजनी गटात चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. या उत्कृष्ट विजयामुळे त्याची आगामी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याने तालुका व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

विद्यार्थ्याच्या या उत्तुंग यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष प्रसाद पीटर आणि मुख्याध्यापक राघवेंद्र होनवाड यांनी आनंद व्यक्त करत त्याला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Recent Comments