Khanapur

बीडी येथे ‘प्रजासेवा आंदोलन’ यशस्वी

Share

खानापूर तालुक्यातील बीडी गावात आयोजित करण्यात आलेल्या महसूल मंडळ (होबळी) स्तरावरील ‘प्रजासेवा आंदोलन’ सभेचा शुभारंभ आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेत त्या तातडीने सोडवण्याचे कडक निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

कर्नाटक शासन आणि तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बीडी गावात या जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की, सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि सर्वसामान्यांच्या अडचणी पारदर्शकपणे व वेळेत सोडवणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या वेळी तहसीलदार यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: