Belagavi

यरगट्टीत ‘प्रजासेवा’ आंदोलनाला मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून प्रारंभ

Share

बेळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले असून, पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सवदत्ती तालुक्यातील यरगट्टी येथे ‘प्रजासेवा’ आंदोलनाचा प्रारंभ केला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरात जनस्पंदन कार्यक्रम राबवले जात आहेत. बेळगाव जिल्ह्यातील पहिला जनस्पंदन कार्यक्रम यरगट्टीत पार पडला असून, येत्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम पूर्ण करून नागरिकांना जलद दिलासा दिला जाईल, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

जमीन हक्क, घरकुल योजना, केईबी (वीज वितरण कंपनी) समस्या आणि शाळा-कॉलेजांशी संबंधित प्रलंबित समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या कार्यक्रमाला सवदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, एनडब्ल्यूकेआरटीसीचे उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: