Belagavi

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून जुन्या पी. बी. रोडवरील परिसराचा कायापालट

Share

‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जुन्या पी. बी. रोडवरील कचऱ्याचे साम्राज्य असलेला परिसर पूर्णपणे स्वच्छ करून तेथे सुंदर उद्यान उभारले आहे.

जुन्या पी. बी. रोडवरील सेठ पेट्रोल पंपाजवळील कचरा टाकाऊ जागेची (GVP) स्वच्छता करून तेथे सौंदर्यीकरण करण्यात आले. या मोहिमेत नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर, प्रभारी आरोग्य निरीक्षक एस. एम. कलाल, सहायक आरोग्य निरीक्षक शिवप्रसाद हरकुणी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन वृक्षारोपण केले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना उघड्यावर कचरा न फेकता कचरा वर्गीकरणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Tags: