Belagavi

बेळगावात हार्मोनी कॉलनीत विकासकामांचा शुभारंभ

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या पुढाकाराने महांतेश नगरमधील हार्मोनी कॉलनीसह विविध भागांत रस्ते आणि गटार बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री विशेष आयपीडी व विशेष अनुदानातून ही विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात भूमिगत गटार, रस्ते आणि चिखलाची मोठी समस्या होती. आता ड्रेनेजचे काम पूर्ण झाले असून येत्या आठवड्यात रस्ते व गटारांचे काम पूर्ण केले जाईल, असे आमदारांनी सांगितले.

तसेच शहरातील खड्डे बुजवण्यात आले असून ऑक्टोबरमध्ये डांबरीकरण प्लांट सुरू होताच उर्वरित रस्त्यांचे काम पूर्ण केले जाईल, असा विश्वास आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केला.

या वेळी स्थानिक रहिवाशांनी आमदार आसिफ सेठ यांनी स्वतः भेट देऊन ड्रेनेज, रस्ते, विजेची सोय आणि नळ योजनेचे काम मार्गी लावल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाला महापालिका अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: