Khanapur

चिक्कमुनवळ्ळीत सरकारी शाळेचा शताब्दी महोत्सव

Share

खानापूर तालुक्यातील चिक्कमुनवळ्ळी येथील शंभर वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या ऐतिहासिक सरकारी वरिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आमदार विठ्ठल हलगेकर यांनी भेट देऊन विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.

या वेळी बोलताना आमदारांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच या ज्ञानमंदिराच्या पुढील विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या सोहळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षकवृंद, शिक्षण समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: