Belagavi

आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत आरोहीचे उल्लेखनीय यश

Share

मूळची गौंडवाड येथील व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या आरोही अभिषेक हुवाणी हिने मलेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.

आरोहीने आपल्या उत्कृष्ट गणिती कौशल्याच्या बळावर स्पर्धेतील दोन वेगवेगळ्या गटांमध्ये प्रथम व पाचवे स्थान पटकाविले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.

आरोहीच्या या यशामागे तिची मेहनत, सातत्यपूर्ण सराव तसेच मार्गदर्शक पल्लवी थिटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे गौंडवाड तसेच पुणे येथील कुटुंबीयांचा गौरव वाढला असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: