Belagavi

अनगोळमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देणारा जिवंत देखावा

Share

तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी अनगोळ येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ व शिवनेरी युवक मंडळाच्या वतीने यंदा ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर आधारित जिवंत देखावा सादर करण्यात येत आहे.

अनगोळमधील रघुनाथ पेठ येथील शिवनेरी युवक मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात समाजाचे डोळे उघडणारा देखावा साकारला आहे. आजची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे पाहून, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या १५ दिवसांच्या परिश्रमातून नवी ध्वनिमुद्रण यंत्रणा आणि कलाकारांच्या साहाय्याने हे सुंदर नाट्यरूपक तयार केले आहे.

गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसापासून सुरू झालेला हा देखावा विसर्जन सोहळ्याच्या आदल्या दिवसापर्यंत दररोज दाखवला जाणार आहे. गावाकडून शहरात कॉलेज शिक्षणासाठी आलेला एक तरुण चुकीच्या संगतीमुळे कसा व्यसनाधीन होतो आणि पुढे एका चांगल्या मित्राच्या प्रभावातून भक्ती व सन्मार्गाकडे कसा परततो, याचे प्रभावी चित्रण यामध्ये करण्यात आले आहे.

बेळगाव शहर आणि परिसरातील गणेशभक्तांनी व नागरिकांनी या जिवंत देखाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Tags: