Belagavi

बेळगावात गणेशोत्सवात दुचाकी वाहनांसाठी मोफत दुरुस्ती सेवा

Share

गणेशोत्सवाच्या उत्साहात मध्यरात्री किंवा गर्दीत दुचाकी अचानक बंद पडल्यास आता भक्तांना काळजी करण्याची गरज उरणार नाही. बेळगाव स्कूटर अँड मोटरसायकल मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशन आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवात मोफत दुचाकी दुरुस्ती सेवा पुरवली जात आहे.

असोसिएशनच्या वतीने शहरातील पाच प्रमुख विभागांत ही व्यवस्था करण्यात आली आहे. धर्मवीर संभाजी महाराज चौक, वडगाव, गोवा वेस सर्कल, फोर्ट रोड आणि टिळक चौक या मध्यवर्ती ठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे. भक्तांची अडचण होऊ नये म्हणून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकृत संपर्क क्रमांक देण्यात आले असून सर्व आयोजक व मेकॅनिक बांधव एकजुटीने या सेवेत कार्यरत आहेत.

या उपक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार निंबरगिणकर, उपाध्यक्ष राजू रेडेकर, सचिव मारुती गुरव, खजिनदार महेश काकतीकर, संघटक विजय शिंदे व गिरीश नाईक (पिल्लू मिस्त्री) यांच्यासह बाबू कडमोली, दत्ता पाटील, निलेश चलगुडकर, प्रमोद कंग्राळकर, सचिन गवळी, रवी कडहट्टी व इतर मेकॅनिक बांधव सेवा देत आहेत.

Tags: