बिम्स ऑडिटोरियममध्ये आयोजित दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीतावरून एक रंजक प्रकार घडला. वंदे मातारामचे केवळ दोनच कडवे लावून गाणे बंद केल्याने माजी मुख्यमंत्री तथा खासदार जगदिश शेट्टर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संपूर्ण गाणे लावण्याची कडक सूचना दिली.

गुरुवार दि. १८ सप्टेंबर रोजी दिव्यांग कल्याण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘वंदे मातरम’ हे गीत ध्वनिवर्धक प्रणालीवर केवळ दोन कड्यांपर्यंत वाजवून थांबवण्यात आले. ही गोष्ट लक्षात येताच खासदार जगदिश शेट्टर यांनी राष्ट्रगीत मध्येच न थांबवता सर्व ६ कडवे पूर्ण वाजवले पाहिजेत, असे तेथील कर्मचाऱ्यांना बजावले.

शेट्टर यांच्या सूचनेनंतर बिम्सच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मोबाईलवरून पूर्ण गीत शोधून ध्वनिवर्धकावर प्रसारित केले. अलीकडच्या काळात ‘वंदे मातरम’वरून विविध वाद समोर येत असताना, जगदिश शेट्टर यांनी दाखवलेला हा तत्परता आणि राष्ट्रगीताप्रतीचा आदर पाहून व्यासपीठावर उपस्थित उपमहापौर हनुमंत कोंगाली, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.


Recent Comments