Belagavi

कंग्राळी बुद्रुक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी पुन्हा १० लाखांचा निधी!

Share

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावात नव्याने उभारण्यात येत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामासाठी शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा दुसरा हप्ता म्हणून १० लाख रुपयांचा चेक आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गुरुवारी मंदिर समितीकडे सुपूर्द केला.

मंदिर बांधकामासाठी शासनाकडून एकूण ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यापैकी पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला होता, तर आता दुसऱ्या हप्त्याची रक्कम वितरित करण्यात आली आहे. कंग्राळी बुद्रुक गावच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेशी जोडल्या गेलेल्या या मंदिराच्या उभारणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले.

मंदिराचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा आणि गावात धार्मिक उपक्रमांना गती मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. या वेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, मंदिर समितीचे सदस्य, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: