बेळगाव महानगरपालिका आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली.


शहरातील विविध प्रमुख रस्ते आणि उपनगरांना भेट देऊन त्यांनी रस्त्यांची पाहणी केली. खराब झालेल्या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय टाळण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सह्याद्री नगर आणि कुवेम्पू नगर परिसरातील कामाची पाहणी करताना त्यांनी दर्जाबाबत माहिती घेतली. वापरण्यात येणारे साहित्य दर्जेदार असावे अशा सूचना त्यांनी दिल्या. यानंतर रामनगर, ज्योती नगर, जयनगर, मुस्तफा कॉलनी आणि शाहूनगर परिसरातही पाहणी करण्यात आली.

“नागरिकांच्या रोजच्या रहदारीच्या रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत,” असे निर्देश आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या दर्जाची तपासणी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. या पाहणी दौऱ्यात महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम., नगरसेविका वीणा विजापुरे आणि साहाय्यक अभियंता जगदीश एस. उपस्थित होते.


Recent Comments