मंत्री सतीश जारकीहोळी यांचे कुटुंब आणि निकटवर्तीयांवर पडलेल्या ईडीच्या छाप्याचा उद्योगपती विजय मल्या यांनी तीव्र निषेध केला असून, त्यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) याबाबत भूमिका मांडली आहे.

आरोपपत्र दाखल न करता आणि योग्य चौकशी न करता सार्वजनिकरीत्या व्यक्तीचे चारित्र्यहनन केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. जगात इतर कोणत्याही देशात असा प्रकार घडत नाही, असे सांगत त्यांनी या कारवाईचा निषेध केला. निष्पक्ष चौकशीशिवाय कोणतीही तपास यंत्रणा जाहीरपणे बोलत नाही, असे सांगत त्यांनी स्वतंत्र तपास यंत्रणांच्या कारभारावर टीका केली. ‘एक्स’वर सलग पोस्ट करत त्यांनी सीबीआय आणि ईडीवर गंभीर आरोप केले. तपास यंत्रणांनी तयार केलेल्या खोट्या आरोपांचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.



Recent Comments