बेंगळुरू ग्रामीण जिल्हा पोलीस कार्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक पार पडली. एडीजीपी हेमंत निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आणि कडक बंदोबस्ताबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.


एडीजीपी हेमंत निंबाळकर यांनी बेंगळुरू जिल्हा पोलीस कार्यालयाला भेट देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. उत्सवाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था राखणे, संवेदनशील भागात पूर्वखबरदारी घेणे आणि वाहतूक नियोजनाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक सलोखा राखण्यासाठी स्थानिक नेत्यांसोबत शांतता समित्यांच्या बैठका घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीस पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




Recent Comments